Sat, Nov 17, 2018 13:01होमपेज › Konkan › हत्तींकडून झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीपोटीही मिळणार भरपाई

हत्तींकडून झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीपोटीही मिळणार भरपाई

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


मुंबई :

हत्तीनी शेतपिकांशिवाय अन्य मालमत्तेचे नुकसान केल्यास त्याचीही भरपाई आता मिळणार आहे. सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा हा  कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार आहे. या भागात जंगली हत्तींचा वावर जास्त असून त्यांच्याकडून होणार्‍या  नुकसानीचे प्रमाणही मोठे आहे.

राज्यात जंगली हत्ती  पूर्वी कधीच नव्हते. मात्र, 2002 साली कर्नाटकातून काही जंगली हत्तींचा कळप हा महाराष्ट्रात आला. सुरुवातीला सिंधुदुर्ग व त्यानंतर कोल्हापुरात हे हत्ती आले व स्थिरावले आहेत. मुबलक पाणी , मुक्‍त विहारासाठी जागा व उसासारखे खाद्य यामुळे हत्तींचा मुक्काम कोल्हापुरात आहे. सुरुवातीला  एक - दोन तालुक्यांपुरता असलेला हा उपद्रव आता सहा तालुक्यात म्हणजे निम्म्या जिल्ह्यात पसरला आहे. भावी काळात लगतच्या तालुक्यात हा उपद्र्रव वाढण्याची शक्यता असून त्याची दखल घेऊन सरकारने या हत्तीना आळा घालण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता समिती नेमली आहे. 

त्यानुसार शेतीची अवजारे,  उपकरणे  व बैलगाडीचे नुकसान केल्यास बाजारभावाप्रमाणे 50 टक्के किंवा 5 हजार रुपयांपेक्षा कमी असणारी रक्कम देण्यात येणार आहे.तर संरक्षक भिंत व कुंपणाचे नुकसान केल्यास बाजारभावाप्रमाणे 50 टक्के किंवा 10 हजार रुपयांपेक्षा कमी यापैकी कमी असणारी रक्कम भरपाईपोटी दिला जाणार आहे. 

Tags : Compensation,elephant damages, State Government, Decision,


  •