Thu, Apr 25, 2019 08:11होमपेज › Konkan › वैभववाडी तालुक्यातील सर्व ग्रा. पं. केंद्रचालकांचा सामुदायिक राजीनामा

वैभववाडी तालुक्यातील सर्व ग्रा. पं. केंद्रचालकांचा सामुदायिक राजीनामा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वैभववाडीः प्रतिनिधी 

ग्रामपंचायतीमध्ये नियमित काम करुनही गेले वर्षभर ग्रामपंचायत केंद्र चालकांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपसमारीची वेळ आली आहे.  याबाबत वारंवार मागणी करुनही सी.एस.सी.एस.पी.व्ही कंपनीने दुर्लक्ष केले आहे.अखेर याला कंटाळून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत केंद्रचालकांनी सामूदायिक राजीनामा कंपनीचे तालुका समन्वयक यांच्याकडे दिला आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायत केंद्र संचालकांना नियमित काम करुनही माहे एप्रिल 2017 पासून कंपनीकडून मानधन मिळालेले नाही.  याबाबत संबंधित कंपनी  व प्रशासनाला विचारणा करुनही अद्याप मानधन अदा करण्यात आलेले नाही. 

अल्प मानधनात काम करणार्‍या या केंद्रचालकांना वर्षभर मानधनच देण्यात आले नाही.  त्यामुळे त्यांच्यावर उपसमारीची वेळ आली आहे.ही आमची आर्थिक पिळवणूक होत आहे. याला सर्वस्वी प्रशासन व संबंधित कंपनी जबाबदार आहे.  यामुळे आमच्यावर सामूदायिक राजीनामा देण्याची वेळ आली आहे. वर्षभराचे थकित मानधन त्वरित मिळावे,अशी मागणी करण्यात आली आहे.

Tags : Gram Panchayat center operator, resignation, Vaibhavwadi news


  •