Sun, Jan 20, 2019 00:01होमपेज › Konkan › कुडाळात शिक्षक भारतीचा निषेध मोर्चा

कुडाळात शिक्षक भारतीचा निषेध मोर्चा

Published On: Mar 06 2018 10:39PM | Last Updated: Mar 06 2018 10:22PMकुडाळ : शहर वार्ताहर

विधानपरिषदेचे सभागृह नेते तथा सार्वजनिक  बांधकाममंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानपरिषदेत शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा अवमान  केल्याच्या निषेधार्थ शिक्षक भारती सिंधुदुुर्गच्या वतीने मंगळवारी कुडाळ शहरात  निषेध मोर्चा काढण्यात आला. ना. पाटील यांनी आ. पाटील यांचा केलेला अवमान ही अतिशय खेदजनक बाब असून याचा निषेध करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी यावेळी सांगितले.

 शिक्षक भारतीच्या पदाधिकारी व शिक्षकांनी काळ्या फिती बांधून हाता आ. कपिल पाटील जिंदाबाद, कपिल पाटील आगे बढो हम तुमारे साथ है, चंद्रकांत  दादा पाटील हाय हाय अशा आशयाचे  फलक हातात घेत शिक्षक भारतीने हा निषेध मोर्चा काढला. यात  जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, संतोष पाताडे, सी.डी. चव्हाण, हेमंत सावंत, माणिक खोत, दिपक तारी जनार्दन शेळके, सुधीर चव्हाण, सुश्मिता चव्हाण, अनिता सडवेलकर आदीसह शिक्षक सहभागी झाले होते.