Mon, May 20, 2019 22:12होमपेज › Konkan › कणकवलीत आज बंद, मोर्चा

कणकवलीत आज बंद, मोर्चा

Published On: Dec 07 2017 1:32AM | Last Updated: Dec 06 2017 11:07PM

बुकमार्क करा

कणकवली : प्रतिनिधी 

महामार्ग चौपदरीकरणात बाधित होणार्‍या कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांना चुकीच्या पद्धतीने निवाडा करून मोबदला निश्‍चित करण्यात आला आहे, त्या निषेधार्थ कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्त आणि व्यापार्‍यांनी गुरुवारी (दि. 7) कणकवलीत बंद पुकारून प्रांत कार्यालयावर मूकमोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बुधवारी दिवसभर या पार्श्‍वभूमीवर अनेक घडामोडी घडल्या. मात्र, प्रकल्पग्रस्त आपल्या निर्णयावर ठाम राहिले आहेत. त्यामुळे गुरुवारी कणकवली बंद राहण्याबरोबरच प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.महाराष्ट्र स्वाभिमानचे संस्थापक नारायण राणे यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.