Wed, Jul 24, 2019 07:50होमपेज › Konkan › कणकवलीत  शिवसेनेची स्वच्छता मोहीम

कणकवलीत  शिवसेनेची स्वच्छता मोहीम

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 14 2018 11:34PM

बुकमार्क करा
कणकवली : शहर वार्ताहर  

स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत  स्वच्छ सर्वेक्षण 2018 हा कार्यक्रम कणकवली नगरपंचायतमार्फत कणकवली शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमात सक्रिय सहभाग म्हणून कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने शनिवारी सोनगेवाडी वार्ड क्र .11 मध्ये शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  स्वच्छता मोहीम राबविली. भाजी मार्केट मागील साठलेल्या कचरा उचलत या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.  शिवसेनेचे कार्यकर्ते सुजित जाधव यांच्या वतीने सोनगेवाडी येथील नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप प्रसाद अंधारी यांच्या हस्ते करण्यात आले .  

सोनगेवाडी, पराष्टेकर घर, गुलमोहर बिल्डिंग, भाजी मार्केट मागील परिसर, आशिये रोड लगत असलेला कचरा व झाडेझुडपे तोडून परिसर स्वच्छ करण्यात आला. आ. नाईक हे स्वतः स्वच्छता दूत बनून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.  भाजी मार्केट मागील परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साठूनही  न.पं.च्या कडून उचलला जात नसल्याचे जमलेल्या नागरिकांनी सांगितले . 
सुशांत नाईक म्हणाले, शहर स्वच्छ ठेवायचे झाल्यास जाहिरात, पोस्टर,जनजागृती करून शहर स्वच्छ रहाणार नाही तर त्यासाठी प्रामाणिक पणे रस्त्यावर उतरून स्वच्छतेत स्वतः सहभागी झाले पाहिजे. म्हणूनच कणकवली शहर शिवसेनेच्या वतीने हा उपक्रम राबविला आहे.  
शहरात ज्या- ज्या ठिकाणी कचर्‍याचे साम्राज्य असेल त्या त्या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.यासाठी नागरिकांनी आपल्याशी सपंर्क साधावा. अशा छोट्या- छोट्या मोहीमांमधूनच कणकवली स्वच्छ व सुंदर बनेल असा विश्‍वास सुशांत नाईक यांनी व्यक्‍त केला . 

सुजित जाधव  म्हणाले, न.पं.ने प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी घातली आहे. स्वच्छ व प्रदूषण  मुक्‍त कणकलीचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वांनीच कापडी पिशव्यांचा वापर करावा. याच उद्देशाने सोनगेवाडी वार्ड क्र .11 मध्ये मोफत कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  या स्वच्छता मोहिमेस मुख्याधिकारी अवधूत तावडे व ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसीडर प्रसाद राणे यांनी भेट देत  कौतुक केले.  
उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, महिला जिल्हाप्रमुख स्नेहा तेंडोलकर, सुजित जाधव, शेखर राणे, राजू राठोड, तेजल लिंग्रज, प्रतीक्षा साटम, राजू वर्णे, सुनील पारकर, भूषण परुळेकर, महेश देसाई, डॉ. सतीश पवार, बाळा पराष्टेकर, राजन तांबे, सीताराम पवार, मधुकर शिरकर, संतोष तांबे, साई पाटोळे, तेजस राणे, शुभम तांबे, सुरेश ओटवणेकर, सर्वेश घाडीगावकर, सायली कुंभवडेकर, बाबू आचरेकर, चिन्मय कुडाळकर, निखिल नारिंग्रेकर, सिद्धेश मडव आदी उपस्थित होते. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्‍त करत शिवसैनिकांचे आभार मानले.