Fri, Jul 19, 2019 07:08होमपेज › Konkan ›  ‘स्वाभिमान’च्या दीपा गजोबार नगराध्यक्ष

 ‘स्वाभिमान’च्या दीपा गजोबार नगराध्यक्ष

Published On: May 19 2018 10:55PM | Last Updated: May 19 2018 10:13PMवैभववाडी : प्रतिनिधी 

वाभवे-वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षपदी स्वाभिमानच्या दीपा गजोबार तर उपनगराध्यक्षपदी रवींद्र तांबे विजयी झाले आहेत. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या  झालेल्या या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला.आजच्या या विशेष सर्वसाधारण सभेस शिवसेनेचे दोन्हीही नगरसेवक उपस्थित नव्हते. शिवसेना-भाजपची युती असताना शिवसेना नगरसेवकांची अनुपस्थिती  
चर्चेचा विषय ठरली होती. वैभववाडी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी शनिवारी विशेष सर्वसाधारण सभा नगरपंचायत सभागृहात पिठासन अधिकारी नीता सावंत, मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. 

नगराध्यपदासाठी स्वाभिमान पक्षाकडून दीपा गजोबार व भाजपकडून मनिषा मसुरकर यांनी अर्ज दाखल केले होते. यावेळी या दोघांमध्ये निवडणूक घेण्यात आली. यात दीपा गजोबार यांना दहा  तर भाजपच्या मनिषा मसुरकर यांना पाच मते मिळाली. त्यामुळे या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे दीपा गजोबार विजयी झाल्या. तर उपनगराध्यक्षपदासाठी स्वाभिमानकडून रवींद्र तांबे व भाजपकडून सुप्रिया तांबे यांनी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीत रवींद्र तांबे यांनाही दहा तर  सुप्रिया तांबे यांना पाच मते मिळाल्याने रवींद्र तांबे विजयी झाले.निवडीनंतर स्वाभिमानच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष करण्यात आला. तसेच नगरपंचायत कार्यालय ते स्वाभिमान पक्षाच्या तालुका कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.मावळते नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्षा संपदा राणे,तालुकाध्यक्ष अरविंद रावराणे, जिल्हा प्रवक्‍ते भालचंद्र साठे, जिल्हा उपाध्यक्ष नासीर काझी, दिलीप रावराणे, उद्योजक विकास काटे, शहराध्यक्ष प्रदीप रावराणे, रवींद्र रावराणे, संजय सावंत, महिलाध्यक्षा प्राची तावडे, जि.प.समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, उपसभापती हर्षदा हरयाण, समिता कुडाळकर, बाळा हरयाण, शिवाजी राणे, दीपक गजोबार, शुभांगी पवार, संतोष कुडाळकर, उत्तम मुरमुरे, शोभा लसणे आदी उपस्थित होते.