Tue, Apr 23, 2019 00:06होमपेज › Konkan › तिघा चोरट्यांना नागरिकांनी पकडले!

तिघा चोरट्यांना नागरिकांनी पकडले!

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 11:47PMकुडाळ : वार्ताहर

दागिने पॉलिश करून देतो, असे सांगत बांव येथील महिलेच्या मंगळसूत्रातील सोने गाळून घेत तिची लुबाडणूक केली. या महिलेच्या आरडाओरडीनंतर व ग्रामस्थांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे या तिघांनाही गावातूनच पळताना ग्रामस्थांनी पकडले. यातील एक चोरटा पळताना पडून जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी स.10.30 वा. घडली.

बिहार येथील रितिककुमार सुखनंदन साह (18), देवराजकुमार मागनप्रसाद साह (19), रोशनकुमार सदानंद साह (20) हे बांव येथील शीतल दत्ताराम आंबेरकर हिच्या घरी जात तिची पैंजण पॉलिश करून दिली. यानंतर सौ. नंदिनी नारायण राऊत यांच्या घरी येत तिचे सोन्याचे मंगळसूत्र पॉलिश करून देतो असे सांगत तिच्याकडून दोन तोळ्याचे मंगळसूत्र घेतले व एका द्रवात बुडवून नंतर ते कागदाच्या पुडीत बांधून दिले व तिथून काढता पाय घेतला.

काही वेळाने या महिलेने हे मंगळसूत्र उघडून पाहिल्यावर ते काळे-पांढरे झाल्याचे आढळले. यानंतर ही महिला आरडाओरड करत ही महिला चोरट्यांच्या मागे धावत सुटली. यानंतर हे चोरटे पळत असताना नाईकवाडी रेल्वे ट्रकजवळ धोंडीराज परब, प्रमोद परब, सखाराम परब,नारायण परब,नागेश परब यांनी त्यांना पकडून ठेवले.यातील एक चोरटा पळताना पडून जखमी झाला.या चोरट्यांची हातचलाखी करत या मंगळसूत्रातील 7 ग्रॅम 790 मिली सोने गाळून घेतल्याचे या मंगळसूत्राचे मोजमाप केल्यावर आढळले.या तीनही चोरट्यांनी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले.या घटनेची फिर्याद या महिलेचा पती नारायण कृष्णा राउळ यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे.