Thu, May 23, 2019 04:17होमपेज › Konkan › दहा सप्टेंबर रोजीही विमानाचे लॅन्डिंग नाही!

दहा सप्टेंबर रोजीही विमानाचे लॅन्डिंग नाही!

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 10:52PMकुडाळ : प्रतिनिधी

चिपी विमानतळावर 12 सप्टेंबरला ‘टेस्ट लॅन्डींग’ची तारीख केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी निश्‍चित केली होती.त्यानंतर विमानतळाच्या  ठेकेदार आयआरबी कंपनीसह सर्व प्रशासन यंत्रणा कामाला लागली होती. मात्र चिपी विमानतळावर  काही तांत्रिक बाजूंची पूर्तता झाली नसल्याने  ‘व्हीआयपीं’ च्या विमान लॅन्डींगला विमान कंपनीच्या  वरिष्ठ पातळीवरून परवानगी मिळाली नाही. परिणामी 10 सप्टेंबर व 12 सप्टेंबरचे चिपी विमानतळावर विमान लॅन्डीग तपासणी चाचणी होण्याची शक्यता  नसल्याचे खा.विनायक राऊत यांनी सांगितले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित अशा  ग्रिन फिल्ड चिपी विमानतळावर बुधवार 12 सप्टेंबर रोजी विमानाच्या ‘लॅन्डींग’चा मुहूर्त निश्‍चित झाला आहे.या पार्श्‍वभुमिवर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी शनिवारी चिपी विमानतळाची धावपट्टी,एटीएस टॉवर व इतर सर्व प्रमुख पाँईन्टना भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली.संबंधित अधिकार्‍यांकडून विमानतळाचा आढावा घेत त्यांनी आवश्यक त्या सूचना केल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला कलाटणी देणारा वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळ प्रकल्पावर  12 सप्टेंबर रोजी विमानाचे टेस्ट लॅन्डीग होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, पालकमंत्री दीपक केसरकर,खा.नारायण राणे,खा.विनायक राऊत यांच्यासह आमदार,जिल्हा प्रमुख,विविध पक्षाचे पदाधिकारी,अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे निटनेटके नियोजन व्हावे याकरिता जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांनी  परिपूर्ण आढावा घेतला.

आयआरबीचे प्रकल्प अधिकारी राजेश लोणकर,प्रातांधिकारी शशांक खांडेकर,पोलिस उपअधिक्षक शिवाजी मुळीक, तहसीलदार शरद गोसावी,एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश रेंवडकर,आयआररबीचे योगेश मेहत्रेे,निवती पोलिस निरीक्षक अमोल सांळुके आदी उपस्थित होते.