Wed, Apr 24, 2019 07:53होमपेज › Konkan › कोकण रेल्वे मार्गावर ‘ख्रिसमस स्पेशल’!

कोकण रेल्वे मार्गावर ‘ख्रिसमस स्पेशल’!

Published On: Dec 18 2017 2:35AM | Last Updated: Dec 17 2017 8:40PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : खास प्रतिनिधी

कोकणात हिवाळी पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांची रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण कोकण रेल्वे मार्गावर आणखी तीन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. दि. 22 डिसेंबरपासून या गाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत. या आधीही हिवाळी हंगामासाठी काही विशेष गाड्यांच्या फेर्‍या जाहीर केल्या आहेत.

रविवारी आणखी तीन विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. नव्याने जाहीर केलेल्या विशेष गाड्यांमध्ये नागपूर -करमाळी, करमाळी - मुंबई छ. शिवाजी महाराज टर्मिनस तसेच अहमदाबाद - मंगळुरू मार्गावर या विशेष गाड्या धावणार आहेत. यातील नागपूर - करमाळी विशेष गाडी (01196)  ही  दि. 22 डिसेंबर रोजी नागपूरहून सायंकाळी 7.50 वा. सुटेल आणि गोव्यात करमाळीला ती दुसर्‍या दिवशी रात्री 9.30 वा. पोहोचेल.

करमाळी-मुंबई सीएसएमटी गाडी (01122) ही गाडी दि. 23 व 30 डिसेंबर रोजी धावणार आहे. ही गाडी करमाळीहून रात्री 10.30 वा. सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी 10.30 वाजता ती मुंबईत सीएसएमटीला पोहोचेल. या गाडीला थीवी, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्‍वर, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, ठाणे, दादर या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. 16 डब्यांच्या या गाडीला टू टायरचे 6, थ्री टायरचे 8 तसेच दोन एसएलआर डबे जोडण्यात येणार आहेत.

तिसरी विशेष गाडी गुजरातमधील अहमदाबाद ते कर्नाटकातील मंगळुरू दरम्यान धावणार आहे. ही गाडी (09416/15) ही गाडी दि. 22 व 29 डिसेंबर रोजी धावणार आहे. ही गाडी अहमदाबादहून सायंकाळी 4.15 वा. सुटेल आणि मंगळुरूला ती दुसर्‍या दिवशी सायंकाळी  6.30 वा. पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळुरुहून दि. 23 व 30 डिसेंबर रोजी रात्री 9.35 वा. सुटेल आणि तिसर्‍या दिवशी रात्री 12.30 वाजता पोहोचेल. अहमदाबाद -मंगळुरू विशेष गाडीला नडीयाद, आणंद, वडोदरा, भरुच, सुरत, वापी, वसई, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थीवी, करमाळी, मडगाव, कारवार, कुमठा, भटकल, मुकांबिका रोड, बिंदूर, कुंदापुरा, उडूपी, मुलकी, सुरतकल या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.