Fri, Apr 19, 2019 12:15होमपेज › Konkan › चिरणीचा सुपुत्र जवान अमर आंब्रेला अपघाती वीरमरण

चिरणीचा सुपुत्र जवान अमर आंब्रेला अपघाती वीरमरण

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिपळूण : प्रतिनिधी 

खेड तालुक्यातील चिरणी गावचे सुपुत्र अमर आत्माराम आंब्रे(वय 35) यांना भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत असताना राजस्थानमधील कोटा येथे  झालेल्या अपघातामुळे वीरमरण आले. सोमवारी पुण्यात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

मराठा लाईट इंफ्रंट्रीमध्ये नाईक या पदावर कार्यरत असलेले अमर आंब्रे यांना हौतात्म्य आल्याचे वृत्त खेड तालुक्यात समजताच जिल्ह्याने देशसेवेसाठी एक सुपुत्र गमावल्याचे दु:ख व्यक्त होत आहे. अमर आंब्रे  यांच्यावर पुण्यातील निगडी येथे सैनिकी इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. अमर आंब्रे हे गेली 15 वर्षे भारतीय सैन्यदलात काम करीत असताना आसाम, मेघालय अरूणाचल प्रदेश या ठिकाणी सेवा बजावून सध्या ते राजस्थान कोटा येथे कार्यरत होते. त्यांच्या पश्‍चात वडील आत्माराम आंब्रे, आई अपर्णा, पत्नी सोनाली व साडेतीन वर्षांचा मुलगा आहे.