होमपेज › Konkan › काँग्रेसतर्फे आज महामार्गावर रास्ता रोको

काँग्रेसतर्फे आज महामार्गावर रास्ता रोको

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिपळूण : शहर वार्ताहर

महामार्गाची दुरवस्था थांबविण्यासाठी  काँग्रेस पक्षातर्फे सोमवारी  पनवेल ते सावंतवाडी दरम्यान ठिकठिकाणी एकाचवेळी रास्ता रोको आंदोलन होणार असल्याची माहिती खा. हुसैन दलवाई, माजी आ. रमेश कदम यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

 दलवाई म्हणाले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. कोकणातून जाणार्‍या या महामार्गावर सुमारे 55 ठिकाणी अत्यंत धोकादायक खड्डे पडले आहेत तर वर्षाला एक हजार प्रवासी महामार्गावरील अपघातात मृत्यूमुखी पडत आहेत. हि वस्तुस्थिती विशद करणारे निवेदन दलवाई यांनी दि. 20 नोव्हेंबर रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दिले.  या निवेदनाच्या माध्यमातून महामार्ग सुस्थितीत व्हावा, अशी मागणी होऊनही संबंधित आणखी किती अपघाती मृत्यूची वाट पाहताय, असा सवाल  दलवाई यांनी उपस्थित केला आहे.  महामार्गावरील खड्डे दुरूस्तीच्या नावाखाली अधिकारी व ठेकेदार करोडो रुपयांचे नुकसान करीत आहेत. या सर्व गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी  हे आंदोलन होत आहे.