Fri, Nov 16, 2018 17:07होमपेज › Konkan › चिपळूण-कराड रेल्वेमार्ग रद्द नाही : ना. अनंत गीते

चिपळूण-कराड रेल्वेमार्ग रद्द नाही : ना. अनंत गीते

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिपळूण : विशेष प्रतिनिधी

चिपळूण-कराड रेल्वे प्रकल्प रद्द झालेला नाही आणि तो रद्दही होणार नाही. खासगीकरणाच्या माध्यमातून हा प्रकल्प मार्गी लागेल. बुलेट ट्रेन आणि चिपळूण-कराड रेल्वे मार्ग याचा काडीमात्र संबंध नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी  पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले चिपळूण-कराड रेल्वेमार्गाच्या कराराच्या समारंभाला आपणही उपस्थित होतो. शापुरजी-पालोजी या कंपनीने हे कंत्राट घेतले होते. हा प्रकल्प रद्द झालेला नाही. त्यासाठी दुसरा ठेकेदार शोधला जाईल. या मार्गावर अनेक बोगदे आहेत. परंतु प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण पाठपुरावा करू. तीन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून प्रकल्प होणार असून त्यासाठी राज्याने निधी या आधीच दिला आहे. 
बुलेट ट्रेनला राज्याचा निधी नाही