Sun, Feb 17, 2019 17:32होमपेज › Konkan › बुलेट ट्रेनला राज्याचा निधी नाही

बुलेट ट्रेनला राज्याचा निधी नाही 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिपळूण : विशेष प्रतिनिधी

बुलेट ट्रेनला राज्याचा निधी नाही. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाबाबत ते म्हणाले, पनवेल-इंदापूर या पहिल्या टप्प्याची जबाबदारी या आधीच्या राज्य सरकारवर आहे. इंदापूर ते झाराप हा महामार्ग 2018 पर्यंत पूर्ण होईलच. या रस्त्याचे कामकाज सुरू आहे. 88 टक्के भूसंपादन झाले आहे. त्यामुळे मुदतीत काम होईल. शिवसेना सत्तेत असून विरोधी भूमिका बजावत आहे. कारण विरोधी पक्ष कमी पडला आहे.

पाठिंबा काढला तर जनतेला नाहक निवडणुकीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे सेना अन्यायाला वाचा फोडत आहे. विरोधी पक्ष कमी पडल्याने शिवसेना विरोधी बाजू मांडत आहे. उद्योगाबाबत आपण ज्या घोषणा केल्या त्या आपण पूर्ण करू. नोटाबंदी, जीएसटीला सुरुवातीपासूनच विरोध आहे. याचा परिणाम भोगावा लागणार आहे. सेना राजकीय स्वार्थासाठी विरोध करीत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.