Thu, Jun 27, 2019 16:34होमपेज › Konkan › डिंगणकर दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी

डिंगणकर दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिपळूण : खास प्रतिनिधी

येथील सेवाभावी ब्राह्मण नागरी सहकारी पतसंस्थेतील बारा कोटींच्या अपहारप्रकरणी अटक असलेल्या डिंगणकर दाम्पत्याला येथील न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांच्याकडील आतापर्यंत 83 लाखांची मालमत्ता जप्‍त करण्यात आली असून मंगळवारी एक फ्लॅट आणि 11 लाखांच्या दागिन्यांसह 28 लाखांचा ऐवज जप्‍त करण्यात आला. येथील ब्राह्मण नागरी सह. पतसंस्थेत 2011 ते 2017 या कालावधीत सोळा कोटींचा अपहार झाला.

त्यांपैकी संशयितांनी चार कोटी संस्थेत जमा केले. त्यामुळे बारा कोटींच्या अपहारप्रकरणी संस्थाध्यक्ष बापू काणे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. यानुसार संचालक संजय अशोक डिंगणकर, पिग्मी एजंट श्रेया डिंगणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. याप्रकरणी आरोप असलेला व्यवस्थापक राजेंद्र लोवलेकर अजूनही बेपत्ता आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर चिपळूण पोलिसांनी डिंगणकर दाम्पत्याला अटक केली. त्यांच्याकडून आतापर्यंत 83 लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्‍त केला आहे. पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर यांनी मंगळवारी (दि. 27) त्यांना हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
 

 

 

tags : Chiplun,news,Sauvabhavi, Brahmin, Urban, Co-operative, Credit, Society, Embezzlement, 


  •