Fri, Feb 22, 2019 00:06होमपेज › Konkan › चिपळूण, खेड, गुहागरचा आज बंदमध्ये सहभाग नाही

चिपळूण, खेड, गुहागरचा आज बंदमध्ये सहभाग नाही

Published On: Aug 03 2018 1:35AM | Last Updated: Aug 02 2018 10:40PMचिपळूण : शहर वार्ताहर

सकल मराठा समाजाच्या वतीने येत्या 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे 3 रोजी होणार्‍या जिल्हा बंदमध्ये चिपळूण, गुहागर, खेड तालुके सहभागी होणार नाहीत. 9 ऑगस्टला होणार्‍या बंदमध्ये सहभाग असेल, असे क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी कळविले आहे.

रत्नागिरी येथे मराठा समाजाच्या झालेल्या बैठकीत 3 ऑगस्ट रोजी जिल्हा बंदचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्याआधी चिपळूण, गुहागर, खेडमध्ये 24 जुलै रोजी बंद पाळण्यात आला. महाराष्ट्र बंदमध्ये यावेळी सहभाग घेण्यात आला. यावेळी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. एस.टी. सेवाही ठप्प होती. त्यामुळे 3 ऑगस्टच्या बंदमध्ये चिपळूण, खेड, गुहागर सहभागी होणार नाहीत.