Thu, Jul 18, 2019 00:22होमपेज › Konkan › चिपी विमानतळावरून चार महिन्यात ‘टेकऑफ’!

चिपी विमानतळावरून चार महिन्यात ‘टेकऑफ’!

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 04 2018 9:53PMसावंतवाडी : प्रतिनिधी 

चिपी विमानतळासाठी चुकीच्या पद्धतीने रस्त्यासाठी तरतूद करण्यात आली होती.तरीही आपण या रस्त्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगी मिळविली असुन चार महिन्यात विमानतळावरुन टेकऑफ होईल तर सी-वर्ल्डबाबत स्थानिकात असंतोष निर्माण करण्याचे काम केले गेले. आत्ता कधी नव्हे इतका विकास निधी आणला असताना ‘लॉ अँण्ड ऑर्डर’ची टिका राणेंकडुन केली जात आहे. राणेंनी आपल्या सत्ता काळात काय केले ? असा सवाल गृहराज्यमंत्री  तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला 

येथील श्रीधर अपार्टमेंट संपर्क कार्यालयात ना.केसरकर यांनी  पत्रकारांशी संवाद साधला.सुंदरवाडी महोत्सवात राणेंनी आपण आणलेले प्रकल्प सुरु होत नसल्याची खंत व्यक्त करुन पालकमंत्री ना.केसरकर यांच्यावर टिका केली होती.या टीकेला प्रत्युत्तर देताना ना.केसरकर म्हणाले, रेडी बंदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात सुरु आहे.चिपी विमानतळ येत्या चार महिन्यात सुरु होईल.या प्रकल्पातील रस्त्याचा प्रश्‍न राणे सोडवू शकलेले नाहीत. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी केंद्राच्या पर्यावरण विभागाकडे जावे लागले.

याकामी खा. विनायक राऊत यांची मदत झाली तर यासाठी आपण पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला परंतू तो वेळेत खर्च न झाल्याने अखर्चित राहिला.समस्या निर्माण होणारे निर्णय राणेंनी घेतल्यामुळे हा प्रकल्प रखडला परंतू आता तो मार्गी लागणार आहे. चिपी विमानतळ ते गोव्यापर्यत मोठे रस्ते होत आहेत. प्रकल्प कोणी आणला हे महत्वाचे नाही तर तो पुर्ण होण्यासाठी काम केले पाहिजे,असा टोला ना.केसरकर यांनी राणेंना लगावला.

सी वल्ड बाबत बोलताना ते म्हणाले,या प्रकल्पाबद्दल स्थानिकांत असंतोष निर्माण करण्याचे काम राणेंनी केले.त्यामुळे हा प्रकल्प अन्यत्र हलविण्यात येईल असे ते म्हणाले.सागरतळाचे विहंगम दृश्य पर्यटकांना पाहता यावेत यासाठी आपण बँटरी ऑपरेटिंग पाणबुड्या प्रथमच सिंधुदुर्गात आणणार असल्याची माहिती ना.केसरकर यांनी दिली.

लष्कर शेतीप्रयोग राबविणार

महिला सबलीकरणासाठी आपण प्रयत्नशिल असून लष्कर शेतीप्रयोग राबविणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.केरळमधील त्रिशूर येथे हा प्रयोग यशस्वी झाला आहे.वेगाने शेती उत्पादनासाठी ही मोठी झेप असल्याचे ते म्हणाले. चांदा ते बांदा योजनेतुन 45 कोटी रुपयांचा निधी आणला ही योजना सर्वसामान्यांसाठी तयार केली असल्याचे ते म्हणाले.