होमपेज › Konkan › मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश रद्द करावा : अशोक वालम

मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश रद्द करावा : अशोक वालम

Published On: Apr 23 2018 11:12PM | Last Updated: Apr 23 2018 10:15PMराजापूर : प्रतिनिधी

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भूसंपादनाचा अध्यादेश मागे घेत असल्याची घोषणा सागवे येथे उद्धव ठाकरे यांच्या साक्षीने केली. मात्र, काही वेळातच मुख्यमंत्र्यांनी हे देसाईंचे वैयक्‍तिक मत आहे आणि असा काही निर्णय न झाल्याचे म्हटले. त्यामुळे शिवसेनेने अध्यादेश रद्द करण्याचा प्रस्ताव द्यायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश रद्द करून कोकणी माणसाचे आशीर्वाद घ्यावेत, असे मत कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्‍त केले.

सागवे येथे शिवसेनेचा नाणार रिफायनरी प्रकल्पविरोधी मेळावा पार पडला. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यानी भूसंपादनाचा अध्यादेश मागे घेत असल्याची घोषणा केली. मात्र, काही वेळातच मुख्यमंत्र्यांनी हे देसाईंचे वैयक्‍तिक मत आहे आणि असा काही निर्णय न झाल्याचे म्हटले. या प्रकारामुळे खूप दुःख झाल्याची प्रतिक्रिया अशोक वालम यांनी व्यक्‍त केली. त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,  हा मेळावा विरोधासाठीच होता. मात्र, कॅबिनेटमध्ये विषय न मांडता, सभेत निर्णय घोषित करणे, प्रक्रियेला धरून नव्हते. तेव्हा शिवसेनेने अध्यादेश रद्द करण्याचा प्रस्ताव दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेने प्रकल्प रद्द करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले असताना, त्यात अडथळा आणलेला आहे. मुख्यमंत्र्यानीच आता सचिवांची बैठक बोलावून आध्यदेश रद्द करावा व कोकणी जनतेचे आशीर्वाद घ्यावेत.  आमचा लढा मात्र खरा भूमिपुत्रांचा असून तो प्रखरपणे सुरूच राहिल, असे मत व्यक्‍त केले.