Sun, Aug 25, 2019 01:31होमपेज › Konkan › मुख्यमंत्र्यांच्या हट्टासाठी रिफायनरी प्रकल्प

मुख्यमंत्र्यांच्या हट्टासाठी रिफायनरी प्रकल्प

Published On: Dec 17 2017 1:27AM | Last Updated: Dec 16 2017 10:45PM

बुकमार्क करा

देवगड : प्रतिनिधी

राजापूर नाणार येथे होऊ घातलेला ग्रीन रिफायनरी हा प्रकल्प केवळ मुख्यमंत्र्यांच्या हट्टासाठीच केला जात आहे. अदानींचे चोचले पुरविण्यासाठीच रिफायनरीच्या माध्यमातून कोकणाला फसविले जात असल्याचा आरोप खा. विनायक राऊत यांनी केला. या प्रकल्पाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार झाला नाही, तर शिवसेना उग्र आंदोलन छेडेल व कोकण वाचविण्यासाठी शिवसेनाउभी राहील, अशा शब्दांत त्यांनी प्रकल्पाविरोधात असलेली शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत खा. राऊत बोलत होते. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, कणकवली विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश भोगले, युवा सेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, महिला तालुकाप्रमुख सौ. वर्षा पवार, देवगड शहरप्रमुख संतोष तारी उपस्थित होते.

खा. विनायक राऊत यांनी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत असलेली शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना या प्रकल्पाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाम विरोध केला आहे.

1 लाख रोजगार हा भूलभुलय्या

मच्छीमारी व्यवसाय तसेच आंबा, काजू आदी फळपिकांवरही प्रकल्पामुळे गंभीर परिणाम होणार आहे. अशा घातकी प्रकल्पांपेक्षा मच्छीमारी, आंबा व्यवसाय यावर आधारित व निसर्गाला हानी न पोहोचविणारे प्रकल्प राबवावेत, ही शिवसेनेची भूमिका आहे. या प्रकल्पामध्ये तीन लाख कोटींची गुंतवणूक आहे व 1 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे, असे गाजर दाखविले जात आहे. हा केवळ भूलभुलय्या आहे.