Mon, Aug 19, 2019 13:22होमपेज › Konkan › राणेंबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील: तावडे

राणेंबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील: तावडे

Published On: Jan 11 2018 10:18PM | Last Updated: Jan 11 2018 10:18PM

बुकमार्क करा
 

रत्नागिरी : प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यांपासून माजी मुख्यमंत्री व कोकणचे नेते नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाबाबत विविध अंदाज व्यक्‍त केले जात आहेत. मात्र, राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेतील, असे राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. 

‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी ते रत्नागिरीत आले होते. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी वरील वक्‍तव्य केले. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नारायण राणे यांनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला आहे. मात्र, शिवसनेचा विरोध आणि गुजरातमधील निवडणुका यामुळे मंत्रिमंडळातील त्यांचा प्रवेश लांबला आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, आतापर्यंतच्या वाटचालीत राणेंनी वेळोवेळी आपली दिशा स्पष्ट केली. आताही राणे यांची भूमिका ठाम आहे. पण त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाचा निर्णय मुख्यमंत्री  घेतील. राज्यात अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्‍त आहेत. त्याठिकाणी अतिरिक्‍त शिक्षकांचे समायोजन सुरू असून लवकरच शिक्षक भरती होईल, असे तावडे यांनी सांगितले.