Tue, Mar 26, 2019 01:36होमपेज › Konkan › भात उत्पादकांची पालकमंत्र्यांकडून फसवणूक!

भात उत्पादकांची पालकमंत्र्यांकडून फसवणूक!

Published On: Dec 21 2017 1:52AM | Last Updated: Dec 20 2017 10:42PM

बुकमार्क करा

ओरोस : प्रतिनिधी

शासनाच्या भात खरेदीच्या जाचक अटींमुळे जिल्ह्यातील भातखरेदी रखडली असून तीन वर्षापूर्वीचे तालुका खरेदी विक्री संघाचे 80 लक्ष रु. भाडे थकीत आहे. शेतकर्‍यांसाठी भात गिरणी उभारून सर्वच प्रकारचे भात खरेदी करू, या पालकमंत्री दीपक केसरकरांच्या फसव्या घोषणेमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या भात खरेदी बाबत 5 जानेवारी पर्यंत तोडगा न काढल्यास भात उत्पादक शेतकर्‍यांना  बरोबर घेऊन आंदोलन उभारण्याचा इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. 

श्री. सावंत म्हणाले, भाताला आधारभूत किंमत मिळावी यासाठी  जिल्ह्यात 28 भात खरेदी केंद्र स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला, परंतू या केंद्रावर विक्री करताना सातबारावर शेतकर्‍याचे नाव व भातशेती असा  उल्लेख असावा, अशी जाचक अट आहे. यामुळे अनेक शेतकरी नाईलाजास्तव खाजगी विक्रेत्यांना कमी दराने भात विक्री करत आहेत.  यामध्ये शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या भाताला योग्य दर देऊन सर्व प्रकारचे भात खरेदी  करण्यासाठी  कुडाळ - एमआयडीसी येथे भात गिरणी प्रकल्प उभारण्याचे जाहीर केले होते. मात्र या गिरणी मार्फत सध्या  घेण्यात येणारे भाव हे  रूपाली, चिंटू, सोनम यारख्या बारीक जातीचेच भात खरेदी केले जात आहे.  जिल्ह्यात एक काडी, वालय या पारंपारिक जातीचे भात उत्पादन घेतले  केले जाते. परंतु हे जाड व्हरायटीचे भात या गिरणी मार्फत घेतले जात नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे.

गेल्या तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील खरेदी - विक्री संघामार्फत भात खरेदी केली. मात्र शासनाने योग्य किमतीने भात खरेदी न केल्याने खरेदी विक्री केंद्रातील भात पडून होते. घुशी, उंदीर यांचेमुळे मोठ्या प्रमाणात भाताचे नुकसान झाले होते. यामुळे  तीन वर्षापूर्वीचे सर्वच खरेदी केंद्राचे 80 लाख भाडे अद्याप शासनाकडून मिळालेले  नसूने खरेदी विक्री संघ आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याबाबत 5 जानेवारपर्यंत तोडगा न काढल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला आहे.