Wed, Jul 17, 2019 20:30होमपेज › Konkan › प्रत्येक महिन्याला मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामावर वॉच राहणार : चंद्रकांत पाटील

प्रत्येक महिन्याला मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामावर वॉच राहणार : चंद्रकांत पाटील

Published On: Sep 08 2018 7:11PM | Last Updated: Sep 08 2018 7:11PMसिंधुदुर्ग : सचिन राणे

सध्या सुरू असलेल्या रस्तेबांधणी कामामुळे महाराष्ट्रातील खड्डे संपायला डिसेंबरही लागणार नाही असे माझे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले. ते मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्यांच्या पाहणी दौऱ्यावर आले असता कासार्डे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.   याचबरोबर त्यांनी मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण रस्ता पूर्ण होईपर्यंत दर महिन्यात एकदा येण्याचे  ठरविले असून प्रत्येक महिन्यात एक टार्गेट देवून ते पूर्ण होते आहे की नाही ते पाहणार असल्याचे त्यांनी सांगितले. \

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम मे 2019 पर्यंत जास्तीत जास्त काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने काम केले जाणार आहे. काही ठिकाणी भूसंपादनात येणाऱ्या अडचणी व पुलाची राहिलेली अपुरी कामे पूर्ण करण्यासाठीही आढावा घेतला जाणार आहे. कोकणात पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन येथील जनतेच्या सुखकर प्रवासासाठी डिसेंबर 2019 पर्यंत 85 टक्के सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविण्यात येणार आहे. पुढच्या पावसाळ्यात प्रवास चांगला होईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली. 

यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे, प्रदेश चिटणीस राजन तेली, प्रदेश सदस्य अतुल काळसेकर,जिल्हा चिटणीस प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष संदेश सावंत, जयदेव कदम, प्रमोद रावराणे, राजू राऊळ, गीतांजली कामत यांच्यासह भाजपा कार्यकर्ते,बांधकाम खात्याचे सचिव, हायवेचे मुख्य अभियंता देशमुख, बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच दिलीप  बिल्डकॉन आणि केसीसी बिल्डकॉनचे अधिकारीही उपस्थित होते.

पुढे बोलताना ना.पाटील म्हणाले की,मागच्या पाहणी दौरा नतंर आजच्या पाहणी दौऱ्यावर येत असताना बऱ्यापैकी काम झाले आहे.तरीही अजूनही त्रुटी राहील्यास येत्या आठ,नऊ व दहा तारूखेपर्यत पूर्ण कामे होतील.पावसाने उघडीक दिल्यास खड्यामुळे वाहनांना अडचण होणार नाही असे  सांगत चाकरम्याचा मुंबई ते झाराप प्रवासात अडचणी येणार नाहीत.तसेच जिल्ह्य़ातील राज्य मार्ग व इतर मार्गच्या दुरूस्तीबाबत ठेकेदार व  खात्या मार्फत कामे करून पूर्ण केली जातील असे सांगितले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेतला.तसेच नागरिकांनी विविध कामांसाठी निवेदने दिली.

 ठेकेदार व अधिकारी यांच्यावर वरुणराजाची कृपा

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा आढावा घेण्यासाठी चौपदरीकरणाच्या  तळगाव ते कलमठ टप्प्यात दौरा केला.मात्र वरुणराजाने केलेल्या कृपेमुळे या भागात पाऊस थांबला असल्याने कोठेही चिखलमय वातावरण किंवा खड्डे दिसलेले नाहीत यायामुळे ठेकेदार व महामार्ग चौपदरीकरण अधिकारी यांच्या ढिसाळ नियोजनाचा अभाव कोठेही दिसला नाही याच कृपेमुळे वरुणराजाची बरसात न झाल्याने  ठेकेदार व अधिकारी याचा जीव भांड्यात पडला.यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे व चिखलमय भाग मंत्री महोदयांना दिसला नाही व प्रवास सुखकर झाला यामुळे गणेशोत्सवा दरम्यानही अशीच वरुणराजाची कृपा राहील हेच गणेशाचरणी प्रार्थना करावी लागेल.