Thu, Mar 21, 2019 15:27होमपेज › Konkan › चिपळुणात शिवजयंती उत्साहात साजरी

चिपळुणात शिवजयंती उत्साहात साजरी

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 10:24PMचिपळूण : खास प्रतिनिधी

ढोल ताशांचा गजर..भगवे झेंडे.. फेटे.. घोडे, वारकर्‍यांची अभंगवाणी  आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषात शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. या निमित्ताने शहर भगवेमय झाले होते. 

सोमवारी संपूर्ण शहर भगवेमय झाले होते. सकाळपासूनच नगर परिषदेसमोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यासाठी विविध मंडळे  येत होती. येथील मराठा रियासत प्रतिष्ठानच्या वतीने शहरात मिरवणूक काढण्यात आली. नाशिक ढोल,घोडे,  पारंपरिक वेशातील लोक, वारकरी शिवाजी महाराजांची पालखी आणि रथातून मिरवणूक काढण्यात आली. न. प. समोरील खेडेकर क्रीडा संकुलापासून ही मिरवणूक निघाली. ती सांस्कृतिक केंद्रापर्यंत काढण्यात आली. यामध्ये शिवसेना जिल्हाध्यक्ष सचिन कदम, बाला कदम, कपिल शिर्के, नगरसेवक विकी नरळकर, वैभव चव्हाण, अंजली कदम आणि मराठा रियासतच्या कार्यकर्त्यांनी मोठा सहभाग घेतला. 

मराठा सेवा संघाच्या वतीने शहरात मोटारसायकल फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमाला डॉ. आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थिती लावली. राजे प्रतिष्ठानतर्फे गोवळकोट येथील गोविंद गडावर शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले.