Thu, Apr 25, 2019 12:12होमपेज › Konkan › ग्रामपंचायत निवडणूक अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्राची अट शिथिल

ग्रामपंचायत निवडणूक अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्राची अट शिथिल

Published On: Feb 08 2018 1:47AM | Last Updated: Feb 07 2018 8:37PMसिंधुदुर्ग ः प्रतिनिधी

राज्य निवडणूक आयोगाकडून सरपंचपदासह सदस्यपदांसाठी मार्च  ते मे 2018 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच रिक्‍त पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाही करण्यात आला आहे.

सरपंचपदाच्या निवडणुकीकरिता अर्ज भरण्याची शेवटची मुदत 28 फेब्रुवारी   ही आहे. ज्या व्यक्‍तीने अर्ज भरण्याच्या दिनांकापूर्वी जातीच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी पडताळणी समितीकडे अर्ज केलेला असेल, पण जिला वैधता प्रमाणपत्र मिळाले नसेल अशी व्यक्ती अर्जासोबत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा व ती निवडून आल्याचे जाहिर झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करेल याबाबतचे हमीपत्र सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. सदस्य पदाबाबत राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकांचा कार्यक्रम विचारात घेता 31 डिसेंबर 2017 पर्यंतच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकीकरिता लागू करण्यात आलेल्या या संबंधातील तरतुदीस 30 जून 2019 पर्यंत मुदत वाढ देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या 6 फेब्रुवारी 2018 च्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार अधिनियमातील दुरुस्तीबाबत अध्यादेश काढण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचे ग्रमाविकास विभागामार्फत सुचित करण्यात आले आहे.

वरील वस्तुस्थिती लक्षात घेता आरक्षित असलेल्या सदस्यपदांवर नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र जोडले  आहे किंवा नाही हे विचारात न घेता जात वैधता प्रमाणपत्र सोबत जोडले नसल्यास ते प्राप्त होण्याबाबत संबंधित समितीकडे सादर केलेल्या पोच पावती, विहीत नमुण्यातील हमीपत्र जोडले असल्यास असे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी दिली आहे.