होमपेज › Konkan › सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव

सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कासार्डे (वार्ताहर )

 क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह, सिंधुदुर्गनगरी येथे  करण्यात आले होते.  

 या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कोषागार अधिकारी,अरविंद मोटघरे   यांचे हस्त करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी किरण  बोरवडेकर, परीक्षक प्रा. डॉ. हरिभाऊ भिसे (कणकवली कॉलेज),  प्रा. एन. डी. कार्वेकर (गोगटे - वाळके कॉलेज, बांद), संगीत विशारद- लक्ष्मण दळवी, मोहन मेस्त्री, श्रीम. सुप्रिया ढोके आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याला कला व संस्कृतीचा मोठा वारसा लाभलेला आहे. पर्यटन संस्कृती बरोबरच याठिकाणी कला व संस्कृतीचेही जतन केले जाते.  सिंधुदुर्ग ही कलाकारांची खाण आहे. या  युवा महोत्सवामधुन उद्याचे कलाकार मिळावेत असा मनोदय अरविंद मोटघरे यांनी  व्यक्त केला.  

या स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे -

 बासरी वादन - धवल धर्मेंद्र जोशी (वराड),  हार्मोनियम वादन - श्रीधर  पाचंगे (कणकवली),  शास्त्रीय गायन - प्रथम गौरांगी सावंत (दोडामार्ग),  द्वितीय - नेत्रा  प्रभूदेसाई, तृतीय - श्‍वेता  सुतार (पोखराण). वक्तृत्व  प्रथम - सलोनी  सावंत (कणकवली), द्वितीय - सागर घाडी (तळेबाजार), तृतीय - अमिता  मेस्त्री (तळेबाजार), मृदंग - प्रथम- शाम  तांबे  (हळवल), द्वितीय - तनुजा  घाडीगावंकर (ओरोस), तृतीय - अमित  मसुरकर (हेदूळ).  लोकगीत -  प्रथम-  रंगखाम , कणकवली सहभागी - श्रीधर पाचंगे , नेत्रा प्रभूदेसाई , चैताली सावंत,  रोशन  तांबे, सुजित  सामंत, तृप्ती  राऊळ.द्वितीय  - आयडीयल ज्युनियर कॉलेज, वरवडे  सहभागी - मानसी तेली , फरजाना  काझी, पल्लवी करंबेळकर, रितीका चव्हाण, वैष्णवी  परब, तेजस्वी  कुयेकर 

लोकनृत्य प्रथम - ज्ञानसंपदा ज्युनियर कॉलेज,तळेबाजार सहभागी - रश्मी  पवार, पूजा पवार, गीता राणे, जान्हवी पांचाळ, अर्चना परब, सिध्दीका मेस्त्री, प्रीती  साटम, मंजिरी वळंजु, नीता  राणे, तनुजा कुळये, सागर  घाडी, सुजित सामंत, स्वप्निल पाताडे, श्रीधर पाचंगे,  अमिता परब. द्वितीय संघ - आयडीअल ज्युनियर कॉलेज, वरवडे. सहभागी - तेजस्वी कुयेस्कर, रितीका चव्हाण, वैष्णवी  परब, फरजाना काझी,  सलोनी सावंत,  साक्षी सावंत, अंजली इंगळे, मानसी तेली, पल्लवी करंबेळकर , सुजित सामंत,  श्रीधर पाचंगे. हे   विजयी युवक - युवती सातारा येथे होणार्‍या विभागस्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होणार आहे.  या स्पर्धकांना जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी शुभेच्छा दिल्या.