होमपेज › Konkan › आजाराला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

आजाराला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Published On: Dec 19 2017 2:00AM | Last Updated: Dec 18 2017 10:46PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

आजारपणाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही घटना रविवार 17 डिसेंबर रोजी सायंकाळी नाचणे येथे घडली. वैभवी रोहित कांबळे(28, रा. निखिल अपार्टमेंट संभाजीनगर नाचण,रत्नागिरी) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत पती रोहित यांनी शहर पोलिसांना खबर दिली.

आत्महत्येची माहिती मिळताच शहर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.  पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन उतरीय तपासणीसाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सुरु आहे.