Sat, Jul 20, 2019 02:52होमपेज › Konkan › नौकाचालक, खलाशांसाठी ओळखपत्र सक्तीचे

नौकाचालक, खलाशांसाठी ओळखपत्र सक्तीचे

Published On: Dec 16 2017 1:42AM | Last Updated: Dec 15 2017 9:40PM

बुकमार्क करा

जैतापूर : वार्ताहर

आय.व्ही.कायदा 1917 अंतर्गत नोंदणी झालेल्या नौका चालक आणि खलाशी यांना बंदर विभागाच्या वतीने ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. बंदर विभागाकडून करण्यात येणार्‍या आकस्मिक तपासणी संबंधित नौका चालक आणि खलाशांकडे ही ओळखपत्रे आढळून न आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे हे ओळखपत्र वापरणे हे सक्तीचे असणार आहे.

बंदर विभागाकडून देण्यात येणार्‍या ओळखपत्रासाठी नौका चालक आणि खलाशी यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड /रक्तगट तापसणी किंवा रक्तगट माहिती असणे आवश्यक, नौका नोंदणी प्रमाणपत्र, दुसर्‍या नौकेवर असल्यास नौका मालकाचे प्रमाणपत्र,  एनआयडब्ल्यूएस, वायएआय प्रमाणपत्र, लाईफ सेव्हिंग टेक्निक्स प्रमाणपत्र, मोबाईल नंबर,जहाज कर्मचारी ओळखपत्र आदी कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि छायांकित प्रती घेऊन 30 डिसेंबरपर्यंत बंदर कार्यालय जैतापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन प्रादेशिक बंदर अधिकारी अजित तोपणो आणि जैतापूर बंदर निरीक्षक रामदास गवार यांनी केले आहे.

जैतापूर बंदर हद्दीमध्ये येणार्‍या सर्व प्रवासी नौका व माल वाहतूक नौका या कायद्याअंतर्गत येत असून कायद्याचा भंग 30 डिसेंबरनंतर झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.