Thu, Apr 25, 2019 05:55होमपेज › Konkan › रत्‍नागिरीत गवा रेडा पडला विहरीत(Video)

रत्‍नागिरीत गवा रेडा पडला विहरीत(Video)

Published On: Feb 24 2018 5:47PM | Last Updated: Feb 24 2018 5:47PMगिमवी : प्रतिनिधी

गुहागर तालुक्यातील मुंढर आडीवाडी येथे गवा रेडा विहरीत पडल्याची घटना घडली. आज सकाळी पिण्याच्या पाण्याच्या विहरीत गवा रडा पडल्याचे दिसल्याने गावकर्‍यांची धावपळ उडाली. वनविभागाला कळवून बचावाचे प्रयत्‍न सुरू केले. 

आज सकाळी गावातील विहरीवर पाणी भरावयास गेलेल्या गावकर्‍यांना विहरीत गवा रेडा पडल्याचे आढळले.त्यांनंतर त्यांनी ही बाब पोलिस व वन विभागाला कळवली. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्‍थळी दाखल होत गवा रेड्याला बाहेर काढण्याचे प्रयत्‍न सुरू केले आहेत. 

माणसाच्या जंगलांवरील अतिक्रमणामुळे वन्य प्राणी मानवी वस्‍तीत घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा घटनांमुळे अनेकदा प्राण्यांना जीवही गमवावा लागतो. तर काही वेळा मानवासही हानी सहन करावी लागते. बिबट्या मानवी वस्‍तीत घुसण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे हा चिंतेचा विषय बनला आहे.