Wed, Sep 26, 2018 12:13होमपेज › Konkan › कुळवंडीनजीक दुचाकीस्वार ठार

कुळवंडीनजीक दुचाकीस्वार ठार

Published On: May 09 2018 2:04AM | Last Updated: May 08 2018 11:08PMखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील कुळवंडी वडाचीवाडी येथे खेड-खोपी मार्गावर मंगळवार दि. 8 रोजी सकाळी 11 वा.च्या सुमारास दुचाकी व पिकअप जीपची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार अजय मधुकर जाधव (22, रा. वावे चिंचाडवाडी) याचा मृत्यू झाला.

खेड पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत वसंत शेलार (36, रा. शिवतर रोड, खेड) महिंद्रा पिकअप जीप घेऊन खेडहून कुळवंडी गावाच्या दिशेला मंगळवार दि. 8 रोजी सकाळी 11 च्या सुमारास जात होता. त्याचवेळी अजय मधुकर जाधव दुचाकी घेऊन कुळवंडीकडून खेडच्या दिशेने येत होता. कुळवंडी वडाचीवाडी येथील एका धोकादायक वळणावर दुचाकी व पिकअप जीपची धडक झाली.