Fri, Apr 26, 2019 09:23होमपेज › Konkan › आमदार उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांची श्रीमंती मिळवली 

आमदार उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांची श्रीमंती मिळवली 

Published On: Mar 25 2018 12:36AM | Last Updated: Mar 25 2018 12:36AMरत्नागिरी : प्रतिनिधी

आ. उदय सामंत विधानसभेच्या निवडणुकीत 40 हजार मतांनी निवडून येतात ही त्यांच्या कार्याची पोहोच असून, त्यांनी कार्यकर्त्यांची श्रीमंती मिळवली आहे. ज्याच्याकडे कार्यकर्त्यांची श्रीमंती आहे तो कधीच पराभूत होऊ शकत नाही, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. रत्नागिरी तालुक्यातील खानू गावात मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत नव्या नळ पाणी योजनेचा भूमिपूजन सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. 

व्यासपीठावर खा. विनायक राऊत, आ. उदय सामंत, जि.प. अध्यक्षा स्नेहा सावंत, जिल्हाप्रमुख राजू महाडिक, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, पं.स. सभापती मेघना पाष्टे, बाबू म्हाप, सुनीला नावले, सरपंच निकिता पवार आदी उपस्थित होते. 

शिवसेना हा विचार : पाटील

शिवसेना हा पक्ष नाही तर विचार आहे. पक्षाचे विचार पटल्यानेच अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे ,असे सहकारमंत्री  पाटील यांनी सांगितले.   शिवसेना दादागिरी करते. पण, ही दादागिरी लोकांच्या भल्यासाठी असते. आम्ही कोणताही हेतू न पाहता लोकांची गरज पाहतो. जनतेच्या कल्याणासाठी आम्हाला अनेकदा तुरुंगात जावे लागते. शिवसेनेच्या शाखाप्रमुखावर एक तरी गुन्हा दाखल असतो. पण आम्हाला त्याची फिकीर नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

खासदार विनायक राऊत हे शांत स्वभावाचे आहेत. राजकारणात त्यांच्याएवढा शांत स्वभावाचा माणूस आपण पाहिला नाही. त्यांच्याविरोधात अनेकांनी अनेकवेळा शड्डू ठोकले. पण त्यांनी त्याचे प्रत्युत्तर आपल्या कामातून दिले, असेही ना. पाटील यावेळी म्हणाले.

विरोधकांवर चौफेर टोलेबाजी

विरोधकांवर टीका करताना ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, शिवसेनेत असताना काहीजण बाळासाहेबांना त्रास देऊन बाहेर पडले. ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला होता त्यांचा आता सत्यानाश झाला. काहीजण जेलमध्ये असून त्यांची परिस्थिती फारच बिकट झाली आहे तर काहीजणांचा कोणताच ठावठिकाणा उरला नसून ते नुसते इकडून तिकडे भटकत आहेत.

 

Tags : Ratnagiri, Ratnagiri news, Khanu village, Chief Minister Drinking Water Scheme,