Thu, Dec 12, 2019 09:50होमपेज › Konkan › भुईबावडा घाटात कोसळली दरड

भुईबावडा घाटात कोसळली दरड

Published On: Jun 24 2019 1:31AM | Last Updated: Jun 24 2019 1:31AM
वैभववाडी : प्रतिनिधी

शनिवारी सायंकाळी वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. भुईबावडा परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या पावसाने शनिवारी रात्री भुईबावडा घाटात रिंगेवाडीजवळ दरड कोसळली. त्यामुळे दुपारपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होती. दुपारनंतर दरड हटविण्यात आली. घाटमार्गात पडझड सुरू आहे.

भुईबावडा-रिंगेवाडीपासून 1. कि. मी. अंतरावर भुईबावडा घाटात शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने दरड व मोठे झाड उन्मळून कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक रविवारी दुपारपर्यंत एकेरी सुरू होती. दुपारनंतर बांधकामच्या कर्मचार्‍यांनी दरड बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली. पहिल्याच पावसात दरडी कोसळण्याचे सत्र सुरू झाल्याने वाहनचालकांसह प्रवाशांमधून भीती व्यक्‍त केली जात आहे. 

घाटात कधीही धोकादायक दरडी कोसळण्याची दाट शक्यता आहे. ठिकठिकाणी बुजलेली गटार, रस्त्यावर वाहणारे पाणी यामुळे घाटमार्गातील प्रवास जीवघेणा ठरत आहे. यासाठी सा.बां.ने आवश्यक उपाययोजना करुन घाटमार्गातील वाहातूक सुरक्षित करावी, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांमधून केली जात आहे.