Wed, Feb 20, 2019 00:56होमपेज › Konkan › खेडमध्ये भीमसैनिकांचा महामोर्चा

खेडमध्ये भीमसैनिकांचा महामोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खेड : प्रतिनिधी

शहरातील जिजामाता उद्यानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची दि.26 रोजी अज्ञाताने विटंबना केली. या निषेधार्थ शनिवारी खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या नेतृत्वाखाली भीमसैनिकांनी मोर्चा काढला. मोर्चाला राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, बसप आदींसह विध राजकीय व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला.
मोर्चेकर्‍यांनी पोलिस ठाणे, प्रांताधिकारी, तहसीलदार व नगरपालिका येथे निवेदने दिली. त्यानंतर जिजामाता उद्यानात जाहीर सभा झाली. पोलिसांनी पुतळा विटंबना करणारा व्यक्‍ती व त्यामागील सूत्रधारांना तत्काळ अटक करण्याची मागणी करत यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

यावेळी आ. संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, अजय बिरवटकर, प्रकाश शिगवण, आदेश मर्चंडे, जि.प.सदस्य नफीसा परकार आदींसह खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांनी मोर्चेकर्‍यांकडून निवेदन स्वीकारले. अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांनाही निवेदन देण्यात आले. त्यानंतर खेड बसस्थानक मार्गे मराठाभवन पर्यंत मोर्चा नेण्यात आला. त्या ठिकाणी तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन देण्यात आले. प्रबोधनकार ठाकरे उद्यानाला वळसा घालून भीमसैनिक शिवाजी चौक, वाणीपेठ, निवाचा चौक, गांधी चौक मार्गे तिनबत्तीनाका येथे पोहोचले. त्यानंतर जिजामाता उद्यानात सभा झाली. 

Tags : Konkan, Konkan Nerws, Bhim Sainik, rally,  Khed


  •