Mon, Apr 22, 2019 01:42होमपेज › Konkan › मंडणगडात भीमसैनिकांचा मोर्चा

मंडणगडात भीमसैनिकांचा मोर्चा

Published On: Apr 05 2018 11:19PM | Last Updated: Apr 05 2018 10:52PMमंडणगड : प्रतिनिधी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोर्चामध्ये गुरुवारी तालुक्यातील भीमसैनिक रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत मंडणगड दणाणून सोडले.

गुरुवारी सकाळी 11 वाजता मंडणगड तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनता मंडणगड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात एकत्र आले. त्यानंतर हा मोर्चा शहरातील बसस्थानकापासून बाणकोट रोड व बाजारपेठेतून हा मोर्चा थेट तहसील कार्यालयावर  पोहोचला.

मंडणगड तहसील कार्यालयाबाहेर यावेळी जाहीर सभा घेण्यात आली. या जाहीर सभेत ‘रिपाइं’चे नेते दादा मर्चंडे, कोकण विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी आपल्या सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी मंडणगड तहसीलदार प्रशांत पानवेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मंडणगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंडणगड, दापोली, खेड, दाभोळ व राखीव पोलिस दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या होत्या. 

Tags : Bhim Sainik, Dalit, Protest, Mandangad,  Ratnagiri