Thu, May 23, 2019 04:41होमपेज › Konkan › कर्जमाफीच्या कामासाठी बँका रविवारीही सुरु राहणार

कर्जमाफीच्या कामासाठी बँका रविवारीही सुरु राहणार

Published On: Dec 10 2017 1:20AM | Last Updated: Dec 09 2017 8:46PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी बँकेचे कामकाज सुरु ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जिल्हा बँकाच्या शाखांसह राष्ट्रीय बँकाच्या शाखामध्ये कर्जमाफी योजनेचे कामकाज सुरू राहणार असल्याचे जिल्हा  प्रशासनाने सूचित केले आहे. 

कर्जमाफीची रक्‍कम पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्याच्या कामास वेग देण्यासाठी ही सुविधा शनिवारी (दि. 9) सुट्टीच्या दिवशी आणि रविवारी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्हा सहकारी बँका तसेच बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जिल्ह्यातील सर्व शाखा रविवारी सुरू राहणार आहे.‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात घेण्यात आलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये शासनाने बँकांना शनिवारी आणि रविवारी बँका सुरु ठेवून पात्र खातेदारांच्या खात्यात रक्‍कम जमा करण्याच्या  कामाला गती देण्याची विनंती केली होती,  त्यास बँकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे प्रशासनाने सांगितले. 

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये  योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने बँक आणि जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. ज्या खातेदारांच्या बँक खात्यात कर्जमाफीची, वन टाईम सेटलमेंटची  तसेच प्रोत्साहन लाभाची रक्‍कम जमा झाली आहे. त्या शेतकर्‍याला याची माहिती मिळेल, असे  बँकांनी नियोजन करावे, असे निर्देशही  प्रशासनाने दिले आहेत.