Mon, Jun 17, 2019 14:14होमपेज › Konkan › चिपळुणात २३ पासून बॅकवॉटर फेस्टिव्हल

चिपळुणात २३ पासून बॅकवॉटर फेस्टिव्हल

Published On: Dec 20 2017 1:41AM | Last Updated: Dec 19 2017 11:10PM

बुकमार्क करा

चिपळूण : वार्ताहर

येथील ग्लोबल चिपळूण टुरिझम सोसायटीतर्फे दि. 23 ते 25 डिसेंबर दरम्यान ‘बॅकवॉटर फेस्टिव्हल’ व ‘क्रोकोडाईल सफारी’चे आयोजन करण्यात आले आहे. दि. 23 रोजी पालकमंत्री ना. वायकर यांच्या हस्ते दुपारी 3 वाजता या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

मुंबई ते गोवा दरम्यान जाणारे पर्यटक निसर्गरम्य चिपळुणात थांबावेत व परिसरातील पर्यटनस्थळे त्यांनी पाहावीत, या हेतूने हा महोत्सव होत आहे, अशी माहिती अध्यक्ष राम रेडीज यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समीर कोवळे, कृषी अधिकारी मनोज गांधी आदी उपस्थित होते. कार्यक्रमास खा. हुसेन  दलवाई, आ. सदानंद चव्हाण, आ. भास्कर जाधव, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात रोज सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत वाशिष्ठी खाडीत नौकानयन व ‘क्रोकोडाईल सफारी’ याबरोबरच कोकणी खाद्य मेवा, कोकणी लोककला, फनी गेम्स, गोविंदगडावर भ्रमंती, मॅरेथॉन, पतंग स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.