महाड: प्रतिनिधी
गेल्या दिवसांपासून सातत्याने भारत संचार निगमची यंत्रणा महाड पोलादपूर परिसरामध्ये पूर्णपणे कोलमडली असून यामुळे बँक तसे शासकीय कामांवर मोठा परिणाम झाला आहे. या दरम्यान इंटरनेटअभावी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार होत आहे. महाड पोलादपूर तालुक्यातील इंटरनेट यंत्रणा शनिवार रविवारी बंद असल्याने येथील व्यापारी व पर्यटक उद्योगाला फटका बसत आहे.
गेल्या चार दिवसांत तीन वेळा इंटरनेटअभावी बँका तसेच शासकीय कार्यालयातील विविध कामे खोळंबली आहेत. याबाबत शहरातील विविध बँका व उद्योजक व्यापारी यांच्याशी संपर्क साधला असता इंटरनेटमुळे मोठा फटका बसत असल्याचे सांगितले.
पावसाळ्यातही या प्रकरामुळे भारत संचार निगमकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. यावेळी रस्ता दुरुस्ती सुरू असल्याने ऑप्टिकल फायबर लाइन नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले होते. आगामी काळात राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू होणार आहे. यामुळेही महाडपोलाद पूरमधील इंटरनेट यंत्रणा कोलमडल्यास संपूर्ण तालुक्याचा शासकीय कारभार ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
राज्य व केंद्र शासनाने सर्व शासकीय स्तरावर ऑनलाइन पद्धतीने कारभार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.यावर भारत संचार निगमकडून पर्यायी मार्ग शोधून यावर विनाविलंब कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
काल व आज महाड पोलादपूरमधील विविध बँकांमध्ये नागरिकांची दोन दिवस सुट्यांच्या पार्श्वभूमीवर केलेली गर्दी लक्षात घेता त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागल्याचे पाहावयास मिळाले. बँकांच्या अधिकार्यांनाही इंटरनेटअभावी आपण कोणतेही काम करू शकत नसल्याने यावर मात करण्यासाठी शासनाकडे तक्रार करण्याच्या सूचना करण्यात आले आहेत.
या सर्व प्रकाराबाबत भारत संचार निगम लिमिटेडकडे विचारणा केली असा पनवेल तसेच इंदापूर जवळील झालेल्या यंत्रणेतील बिघाडामुळे माळ पोटात पोषण अन्य तालुक्यातील यंत्रणा नांदूर शोधल्याचे मान्य करून यावर सायंकाळपर्यंत उपाययोजना होईल असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एकूणच शासनाकडून केल्या जाणाऱ्या घोषणा प्रत्यक्षात अवतरण्यासाठी असणारी शासकीय यंत्रणाच निष्काम ठरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.