होमपेज › Konkan › आडवलीत खणखणली मोबाईलची रिंग

आडवलीत खणखणली मोबाईलची रिंग

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 8:08PMश्रावण : वार्ताहर 

आडवली गावातील बीएसएनएल मोबाईल टॉवर चालू झाल्याने संपूर्ण परिसर मोबाईल कव्हरेज क्षेत्राखाली आला आहे.सहाजिकच आता प्रत्येकाच्या घरी मोबाईलची रिंग खणखणू लागली आहे. गावात मोबाईल टॉवर उभारण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून आडवलीवासीयांची मागणी होती. स्थानिक कार्यकर्त्यांनी व मुंबईकर चाकरमान्यांनी आणि समाजसेवकांनी या टॉवरसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

अखेर याला यश आले व गावासाठी दूरसंचारचा मोबाईल टॉवर मंजूर झाला. काही दिवसांपूर्वी या टॉवरच्या उभारणीचे काम पूर्ण झाले. आता टॉवर कार्यान्वीत झाल्याने परिसरातील ग्राहकांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.  सध्या या मोबाईल टॉवरवरुन 3 जी सेवा सुरू झाली असून रेंज 1 कि.मी. परिसरात मिळत आहे.  आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर लवकरच जास्तीत जास्त क्षेत्र या टॉवरच्या कक्षेत येईल अशी माहिती बीएसएनएलच्या अधिकार्‍यांनी दिली.