Thu, Jul 18, 2019 02:25होमपेज › Konkan › भाजपचे जनुभाऊ काळे कालवश

भाजपचे जनुभाऊ काळे कालवश

Published On: Mar 26 2018 1:30AM | Last Updated: Mar 25 2018 10:40PMरत्नागिरी : प्रतिनिधी

जनसंघापासून भाजपच्या वाटचालीमध्ये मोलाची भूमिका बजावत कार्यकर्त्यांची फौज उभी करणारे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष जनार्दन नारायण ऊर्फ जनुभाऊ काळे यांचे वयाच्या 92 व्या वर्षी पर्‍याची आळी येथील घरी सायंकाळी 5 वा. च्या सुमारास निधन झाले. 

1975 मध्ये लागू झालेल्या आणीबाणीत जनुभाऊंनी 19 महिने तुरुंगवास भोगला. आणीबाणीत तुरुंगवास भोगल्याबद्दल शासनाकडून मिळणारी पेन्शनही जनुभाऊंनी नाकारली. कालांतराने जनसंघाचे रूपांतर भारतीय जनता पक्षामध्ये झाले. त्यावेळी जनभाऊंच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते घडले. जनुभाऊंनी भाजपचे सहमंत्री, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष या पदांवर काम केले.

कोल्हापूर येथे कानडी-मराठी वादाला हिंसक वळण लागले आणि कानडी लोकांची हॉटेल्स, घरे पेटवून देण्यात आली होती. त्यावेळी रत्नागिरीतून जनुभाऊंनी तांदूळ, धान्य, कापड, वस्त्रे पुरवली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही महिने ते चवे गावी, तर कधी रत्नागिरीत वास्तव्यास होते. 

Tags : Ratnagiri, BJPs Janubhau Kale, Passed away,