Tue, Mar 26, 2019 22:21होमपेज › Konkan › विरोधकांचा बालेकिल्‍ला भाजप फोडणार

विरोधकांचा बालेकिल्‍ला भाजप फोडणार

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 08 2018 9:42PMरत्नागिरी ः प्रतिनिधी

आगामी काळातील निवडणुका लक्षात घेऊन भाजपने विरोधकांच्या बालेकिल्ल्यास खिंडार पाडण्याची योजना आखली आहे. बुधवारी पक्षप्रवेशाने त्याचा प्रत्यय आला. माजी उपनगराध्यक्ष राजेश सावंत यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. बूथकमिट्या 100 टक्के पूर्ण करण्यावर भर देतानाच विरोधकांमधील नाराज गटांना गळाला लावून पक्ष वाढवण्याकरिता व जास्तीत जास्त आमदार निवडून येण्याकरिता भाजपने रणनिती आखली आहे.

दि.7 फेब्रुवारीला भाजपच्या जिल्हा संपर्क कार्यालयात पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात खंडाळा, सांडेलावगण, कळझोंडी, कासारी, वाटद, कांबळे लावगण, चाफे, बसणी, फुणगुस, फणसोप आणि रत्नागिरी शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. खंडाळा येथील राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बाळ जोग यांच्यासमवेत नंदू बेंद्रे, संदीप विचारे, परशुराम पाष्टे, रवींद्र वीर, सुधीर माने, बाळू पाष्टे, सुरेश तांबटकर, गोविंद बलेकर, क्रांतीनगरमधील कृष्णा सावंत, दादा दुदम, शाखाप्रमुख भाऊ चव्हाण, सुनील पाटणकर, अनिकेत चव्हाण आदी तीस जणांनी भाजपत प्रवेश केला. चाफे येथील माजी शाखाप्रमुख वासुदेव गोवळकर, रमेश काताळे, महेंद्र गोताड, बसणीतील सुरेश शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत बंदरकर, शंकर भोसले, फुणगूस येथील अनिल कुळकर्णी, माजी उपसरपंच जितेंद्र कुळकर्णी यांनी भाजपत प्रवेश केला. फणसोप येथील वीरेंद्र साळवी, सुशील साळवी यांचेही भाजपत आगमन झाले.

बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रसाद लाड, जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक उमेश कुळकर्णी यांनी केले. या कार्यक्रमात भाजपचे रत्नागिरी जिल्ह्याचे पालक आ. प्रसाद लाड यांचा रत्नागिरी शहर भाजप अध्यक्ष प्रशांत डिंगणकर, सरचिटणीस बिपीन शिवलकर यांच्यासमवेत ‘भाजयुमा’ शहराध्यक्ष मंदार मयेकर, जिल्हा सरचिटणीस प्रा. नाना शिंदे यांनी सत्कार केला.