Fri, Jul 19, 2019 20:32होमपेज › Konkan › ....ही तर महाराष्ट्रातील यशाची नांदी!

....ही तर महाराष्ट्रातील यशाची नांदी!

Published On: May 15 2018 10:43PM | Last Updated: May 15 2018 10:11PMकणकवली : शहर वार्ताहर

कर्नाटक राज्य  विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. भाजपला  मिळालेल्या यशाबद्दल कणकवली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप कार्यालयासमोर जल्लोष  साजरा करण्यात आला. फटाके फोडून व विजयी घोषणा देऊन हा विजयोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे यश महत्त्वाचे मानले जात असून भाजप कार्यकर्त्यांना बळ देणारे आहे. येत्या निवडणुकीत भाजप कार्यकर्ते जोमाने काम करून महाराष्ट्रात भाजपा उमेदवार विजयी होतील, असा विश्‍वास पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

भाजपा तालुकाध्यक्ष  संदेश पटेल, प्रदेश कार्यकारिणी सदस्या प्रज्ञा ढवण, वाहतूक आघाडी अध्यक्ष शिशिर परुळेकर, महिला तालुकाध्यक्ष गीतांजली कामत, प्रसाद अंधारी, अमित मयेकर, सुप्रिया तायशेटे, साक्षी वाळके, पप्पू पुजारे, परशुराम झगडे, किरण म्हाडगूत, विजय चिंदरकर, समर्थ राणे, सदानंद चव्हाण, बबलू शेख, स्वप्नील पाटील, सुनील गावडे, राजेश ठाकूर, सीताराज परब, शीतल मांजरेकर, रामदास मांजरेकर आदी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते  उपस्थित होते.