Wed, May 22, 2019 10:14होमपेज › Konkan › भाजपच्या संमेलनामुळे कार्यकर्त्यांत चैतन्य

भाजपच्या संमेलनामुळे कार्यकर्त्यांत चैतन्य

Published On: Jan 15 2018 1:42AM | Last Updated: Jan 15 2018 12:18AM

बुकमार्क करा
चिपळूण : विशेष प्रतिनिधी

भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार बाळ माने यांच्या वाढदिनी  मध्यवर्ती असलेल्या चिपळूण शहरात भाजपच्या बूथ सदस्यांचा मेळावा  सोमवार,  दि. 15 रोजी सायंकाळी 5.30 वा. येथील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या पटांगणात आयोजित करण्यात आला आहे.  यावेळी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचा जलसा रंगणार आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून माने यांनी दोन वर्षे यशस्वी काम केले आहे. जिल्ह्यात भाजपला त्यांच्या नेतृत्वखाली उभारी आली आहे. वाढदिनाचे औचित्य साधून भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या बूथ संमेलनाचे आयोजन प्रामुख्याने होते आहे.

यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, नामवंत कर्तृत्ववानांचा गौरव असा भव्यदिव्य कार्यक्रम घेण्यात आला आहे. कार्यक्रमानिमित्त भव्य व्यासपीठ व मैदान बनविण्यात आले आहे. चिपळूण शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही पक्षाचे ध्वज व बाळ माने यांच्या अभीष्टचिंतनाचे पोस्टर्स व फलक ठिकठिकाणी उभे करण्यात आले आहेत. जोरदार वातावरण निर्मिती बनल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांत चैतन्य व उत्साह आहे. 

गेल्या दोन वर्षांमध्ये माने यांनी राजापूर ते मंडणगडपर्यंत अथक परिश्रम घेऊन अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना एकत्र केले. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना पक्षात सामावून घेतले. गावोगाव खोलवर पक्षाची बांधणी केली. आजचा हा वाढदिनाचा सोहळा भाजप कार्यकर्त्यांचा चैतन्य सोहळा असणार आहे.  या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीही रसिकांना मिळणार आहे. हा सांस्कृतिक कार्यक्रम प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांनी साकारला आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री, शर्वरी जमेनीस, भार्गवी चिरमुले, सोनाली कुलकर्णी, प्राची शैलेश, मयुरेश पेम, दीपाली सय्यद, प्रथमेश परब आणि स्वप्निल बांदोडकर आणि रोहित राऊत यांच्या अदाकारीचा आस्वाद घ्यायला मिळणार आहे. त्यामुळे येथे तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपच्या जिल्ह्यातील पहिल्याच अभूतपूर्व सोहळ्याची तयारी पाहून सर्वांच्याच भुवया उंचावणार आहेत.