Sat, Dec 14, 2019 02:09होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात पावसाने ओलांडली १ हजारांची सरासरी

सिंधुदुर्गात पावसाने ओलांडली १ हजारांची सरासरी

Published On: Jul 06 2019 1:34AM | Last Updated: Jul 05 2019 11:12PM
कणकवली : प्रतिनिधी

जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून दमदार बॅटिंग करणार्‍या पावसाने सिंधुदुर्गात 1 हजारांची सरासरी ओलांडली आहे. यावर्षी 1 जून ते 5 जुलै अखेरपर्यंत 1019 मि.मी. पाऊस झाला आहे तर गतवर्षी याच कालावधीत 1066 पावसाची नोंद झाली होती. याचाच अर्थ गतवर्षीच्या सरासरीने आतापर्यंत पाऊस झाला आहे. 

यावर्षी पावसाला काहीशी उशिरा सुरुवात झाली. जूनच्या 20 तारीखपर्यंत मान्सून रेंगाळत होता. मात्र, शेवटच्या आठवड्यापासून पावसाने धुवाँधारपणे बरसण्यास सुरूवात केली ती आतापर्यंत पावसाची स्थिती चांगली आहे. 1 जूनपासून आतापर्यंत एकूण 8157.64  मि.मी. पाऊस झाला आहे तर गतवर्षी याच तारखेअखेरपर्यंत 8539.28 मि.मी. पाऊस झाला होता.