Mon, May 20, 2019 22:05होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात प्लास्टिक निर्मूलन प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्नशील : रफिक मेमन

सिंधुदुर्गात प्लास्टिक निर्मूलन प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्नशील : रफिक मेमन

Published On: Sep 13 2018 1:45AM | Last Updated: Sep 12 2018 9:00PMसावंतवाडी : प्रतिनिधी

जिल्ह्यात निर्माण होणारा प्लास्टिक कचरा नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेले प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.त्यादृष्टीने शासनस्तरावर बोलणी सुरू आहेत,अशी माहिती ऑल इंडिया वेस्ट प्लास्टिक फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश साकला यांनी  येथे दिली 

श्री. साकला  जिल्ह्यात आले असता  त्यांनी येथील प्लास्टिक उद्योजक रफिक मेमन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी रोहीत साकला, निहाल मेमन आदी उपस्थित होते 

श्री. साकला म्हणाले,प्लास्टिकची समस्या जगभर जाणवत आहे. मात्र, प्लास्टिक वेस्ट फेडरेशनमध्ये असलेल्या विविध प्रकल्पाच्या माध्यमातून प्लास्टिकरिसायकल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हयात एखादा प्रकल्प सुरू करता येवू शकतो का? याबाबत  विचार सुरू असून तशाप्रकारे शासनाजवळ बोलणी सुरू आहेत. प्रकल्पासाठी शासनाकडून अनुदान देण्याची तयारी दर्शविल्यास मोठ्या प्रमाणात प्लास्टिक रिसायकल होण्यास मदत होणार आहे.

त्याचबरोबर प्लास्टिकपासून निर्माण होणार्‍या समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे येणार्‍या काळात अशा प्रकारचा प्रकल्प जिल्हा प्रशासन किंवा पालिकेच्या माध्यमातून याठिकाणी उभारता येवू शकतो का यासाठी फेडरेशनचे प्रयत्न आहेत आणि त्या पार्श्‍वभूमीवर शासनाकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे असे यावेळी साकला यांनी सांगितले.दरम्यान, तत्पूर्वी त्यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेत सावंतवाडीविषयी माहिती जाणून घेतली.