Sun, Jul 21, 2019 01:37होमपेज › Konkan › सर्वसाधारण विजेतेपद मुंबईला

सर्वसाधारण विजेतेपद मुंबईला

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 01 2017 11:30PM

बुकमार्क करा

दापोली : प्रतिनिधी

येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात पार पडलेल्या अश्‍वमेध क्रीडा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद  मुंबई विद्यापीठाने तर उपविजेतेपद   पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने पटकावले आहे. 

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य व सुरेंद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबई व पुणे विद्यापीठाला शंकरभाई रघुनाथराव दलवाई फिरता चषक व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. कबड्डी 
स्पर्धेत पुरुष गटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद प्रथम, मुंबई विद्यापीठ द्वितीय तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे तृतीय. कबड्डी महिला गटात मुंबई विद्यापीठ प्रथम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वितीय, तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने तृतीय क्रमांक मिळविला.  

खो खो स्पर्धेत पुरुष गटात स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडला प्रथम, मुंबई विद्यापीठ द्वितीय, तर पुणे विद्यापीठाने तृतीय क्रमांक मिळविला.