होमपेज › Konkan › जनआक्रोश आंदोलनात सावंतवाडीवासीयांची उडी

जनआक्रोश आंदोलनात सावंतवाडीवासीयांची उडी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सावंतवाडी : प्रतिनिधी

गोवा-बांबोळी रुग्णालयात पूर्ववत मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी दोडामार्गवासीयांनी सुरू केलेेल्या आक्रोश आंदोलनाला पाठिंबा व्यक्‍त करण्यासाठी व हे आंदोलन गावागावांत पोहोचविण्यासाठी  जि.प.चे माजी  आरोग्य व शिक्षण  सभापती मंगेश तळवणेकर यांनी सोमवारपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत जनआंदोलन सुरू केले, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी  व्यक्‍त  केला. दरम्यान, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्गमधील जनआक्रोश आंदोलनाला पाठिंबा म्हणून धरणे आंदोलन सुरू केले आहे.

आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी आंदोलनस्थळी आलेले प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व तहसीलदार सतीश कदम यांना सादर केले. गोवा-बांबोळी  रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा देणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारणे, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची दुरवस्था सुधारावी,  अशा विविध  समस्या त्यांनी मांडल्या.

आंदोलकांशी अधिकार्‍यांची चर्चा

आंदोलकांशी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार  सतीश जाधव यांनी भेट दिली व  चर्चा केली.दोडामार्ग तालुकावासीयांच्या सुरु असलेल्या  जनआक्रोश आंदोलनाला पाठींब्यासाठी दुसरे धरणे आंदोलन सावंतवाडी नगराध्यक्ष प्रेमानंद उर्फ  बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर झाले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जि. प. सदस्य मायकल डिसोजा, उपनगराध्यक्षा अन्‍नपूर्णा कोरगावकर, सभापती आनंद नेवगी, बाबू कुडतरकर,शर्वरी धारगळकर,शहरप्रमुख शब्बीर मणियार, सुरेश भोगटे,अभय पंडीत, विलास जाधव सचिन इंगळे,संजय पेडणेकर आदी  उपस्थित होते.

या धरणे आंदोलनात माजी आमदार शिवराम दळवी ही सहभागी झाले होते.या आंदोलकांना प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व  तहसीलदार सतीश कदम  यांनी  भेट दिली. गोव्याला राज्याकडून वीज जाते, तिलारीचे पाणी जाते अनेक बड्या पदावर मोठ्या शहरात गोवेकर युवक काम करत आहेत दोन्ही राज्याचे सलोख्याचे संबंध असताना गोव्याचे आरोग्यमंत्री हेकेखोरपणा करुन सिंधुदुर्गातील रुग्णाना शुल्क लावत आहे. हे चूक आहे दोडामार्गवासीयांच्या आंदोलनाला शहरवासीयांचा पाठिंबा व्यक्‍त करण्यासाठी हे एक दिवशीय धरणे आंदोलन असल्याचे नगराध्यक्ष साळगावकर यांनी सांगितले.दरम्यान या दोन्ही आंदोलनात ज्येष्ठ शेतकरी नेते वसंत उर्फ अण्णा केसरकर कुठे  दिसले नसल्याची चर्चा सुरू होती.

या आंदोलनात सुरेश सावंत,पुरुषोत्तम राऊळ,फ्रान्सिस रॉड्रिक्स,समिर शेख,प्रसाद आरविंदेकर, बाबल्या दुभाषी,अँड बावकर,चंद्रकांत जाधव यासह भोसले तळीकर प्रतिष्ठानचे मुख्याध्यापक विनायक गांवस, भाजपा शहराध्यक्ष संजू शिरोडकर आदी सहभागी झाले आहेत. आंदोलनासाठी ग्रामीण  महिलांसह  कारिवडे,माडखोल,कोलगाव,कुणकेरी परिसरातून मोठा जनसमुदाय उपस्थीत होता,

मंगेश तळवणेकर याच्या या आंदोलनास भाजप चिटणीस राजन तेली, माजी आ. शिवराम दळवी, सावंतवाडी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, सावंतवाडी बार असोशिएशनचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. परिमल नाईक , कॉग्रेस जिल्हा सरचिटणिस राजेंद्र मसुरकर,कौस्तुभ पेडणेकर,सभापती आनंद नेवगी, शकिल शेख,भाजपाचे मनोज नाईक, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष  विजय देसाई यांनी   पाठिंबा दर्शविला.

 

Tags : Sawantwadi, Dodamarg news, health demands, movement,Support Sawantwadi,


  •