होमपेज › Konkan › शस्त्र परवान्यांची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरुपात भरावी लागणार

शस्त्र परवान्यांची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरुपात भरावी लागणार

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 20 2017 10:01PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

केंद्र शासन, गृह विभाग यांच्याकडील 10 नोव्हेंबर 2017 रोजीच्या पत्रान्वये शस्त्र अधिनिमय, 1959 व शस्त्र  नियम, 1962 नुसार देण्यात आलेल्या सर्व शस्त्र परवान्यांची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरुपात भरण्यासाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या एनडीएल या संगणक प्रणालीमध्ये भरावयाचे आहे. 

याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून उपविभागीय दंडाधिकारी व कार्यकारी दंडाधिकारी यांच्यामार्फत शस्त्र परवानाधारकांच्या माहितीचा नमुना पुरविण्यात येणार आहे. ही माहिती केंद्र शासनाच्या एनडीएल या संगणक प्रणालीमध्ये नोंद न झाल्यास परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच परवाना नोंद केल्या नंतर एक युनिक क्रमांक मिळणार आहे.  तसेच हा युनिक नंबर नसल्यास पुढील नूतनीकरण करण्यात येणार नसून परवाना रद्द  करण्यात येणार आहे.

युनिक क्रमांक नसलेल्या परवानाधारकांची तालुकानिहाय यादी जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी, उपविभागीय दंडाधिकारी, कार्यालय सर्व व कार्यकारी दंडाधिकारी, कार्यालय सर्व यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली आहेत.या यादीतील परवानाधारक यांनी संबंधित कार्यालयात उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील अर्ज भरुन त्यासेाबत परवान्याची छायांकित प्रत जोडून दिनांक 31 जानेवारी पर्यंत जिल्हादंडाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे समक्ष सादर करावी.

यापूर्वी दिनांक 01 जुलै 2013 रोजीही प्रेस नोट प्रसिध्द करण्यात आली होती. ही माहिती मुदतीत सादर न करणार्‍या परवानाधारकांचा परवाना रद्द करण्यात येणार आहेत. याबाबत कोणताही वैयक्तिक पत्र व्यवहार केला जाणार नाही याची सर्व परवानाधारकांनी नोंद घ्यावी. असे अपर जिल्हादंडाधिकारी , रत्नागिरी यांनी कळविले आहे. त्यामुळे या मुदतीत सर्व शस्त्र परवान्यांची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरुपात जे भरणार नाहीत, ते अडचणीत येणार असल्याच कळते.