Tue, Feb 19, 2019 20:42होमपेज › Konkan › सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीला लवकरच मंजुरी

सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीला लवकरच मंजुरी

Published On: Jan 23 2018 10:23PM | Last Updated: Jan 23 2018 9:53PMसिंधुदुर्गनगरी ः प्रतिनिधी
सिंधुदुर्गनगरीचा खर्‍या अर्थाने विकास व्हावयाचा असेल तर त्यासाठी या नगरीची नगरपंचायत होणे आवश्यक आहे. ही नगरपंचायत लवकरात लवकर व्हावी, यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे प्रयत्न सुरु असून तसा प्रस्तावही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठविण्यात आला आहे.

त्यामुळे लवकरात सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत कार्यरत होईल, असा विश्‍वास भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल काळसेकर यांनी व्यक्‍त केला. सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. काळसेकर हे बोलत होते. प्रभाकर सावंत, कुडाळ तालुका अध्यक्ष चारुदत्त देसाई, भाई सावंत, उदय जांभवडेकर, ग्रामपंचायत सदस्य अनंतराज पाटकर, मारुती परब, आदी उपस्थित होते.