Tue, Jul 16, 2019 21:59होमपेज › Konkan › अंगणवाडी सेविकांचे मानधन चक्क एअरटेल बँकेत जमा!

अंगणवाडी सेविकांचे मानधन एअरटेल बँकेत जमा!

Published On: Jan 09 2018 10:26AM | Last Updated: Jan 09 2018 10:26AM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

मोबाईल नंबरला आधार संलग्न केल्याचा फटका जिल्ह्यातील आशा आणि अंगणवाडी सेविकांना बसत आहे. एअरटेल कंपनीचे मोबाईल सिमकार्ड वापरणार्‍या या आशा आणि अंगणवाडी सेविकांचे मानधन चक्क एअरटेल बँकेत जमा होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

एअरटेल बँकेत अकाउंट नसतानाही केवळ मोबाईल नंबर आधारकार्डशी लिंक केल्याने हा प्रकार घडल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. याबाबत तालुका आरोग्य विभागाकडे आशा स्वयंसेविकांकडून 2 तक्रारींही दाखल झाल्या आहेत.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांर्तगत येणार्‍या आशा आणि शिक्षण विभागांतर्गत येणार्‍या अंगणवाडी सेविका यांचे मुळातच तुटपुंजे असणारे मानधन त्यांच्या खात्यात जमा होते. मात्र, जिल्ह्यातील काही आशा आणि अंगणवाडी सेविकांचे बँक खाते असतानाही त्यांच्या खात्यात मानधन न जमा होता ते परस्पर एअरटेल बँकेत जमा होत आहे. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न पीडित कर्मचार्यांची केला असता आधार संलग्न झालेल्या एअरटेल मोबाईल क्रमांकामुळे हे मानधन एअरटेल बँकेत जमा झाल्याचे समजले.