Fri, Jan 24, 2020 21:42होमपेज › Konkan › दोडामार्ग उपनगराध्यक्षांच्या गाडीची अज्ञाताकडून काच फोडण्याचा प्रयत्न

दोडामार्ग उपनगराध्यक्षांच्या गाडीची अज्ञाताकडून काच फोडण्याचा प्रयत्न

Published On: Jul 17 2019 2:06AM | Last Updated: Jul 16 2019 11:37PM
दोडामार्ग : प्रतिनिधी 

कसई-दोडामार्ग नगरपंचायतीचे भाजपाचे उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या चारचाकी गाडीच्या दर्शनी भागावर दगड मारून काच फोडण्याचा प्रयत्न अज्ञातांकडून करण्यात आला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याबाबत चव्हाण यांनी दोडामार्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

शहरात एस.टी.बस स्टँडसमोर उपनगराध्यक्ष यांची साई प्लाझा इमारत आहे. तेथेच ते कुटुंबियासमवेत राहतात. सोमवारी रात्री 12 वा.च्या दरम्यान इमारतीच्या बाहेर मोठा आवाज आला.  पण चव्हाण यांनी रात्र फार झाल्याने बाहेर येणे टाळले. मंगळवारी सकाळी ते आपल्या गाडीजवळ आले असता गाडीच्या दर्शनी भागाच्या काचेवर मोठा दगड आढळून आला.घटनेबाबत पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.  चव्हाण यांच्या इमारतीला सी.सी.टी.व्ही कॅमेरे असल्याने अज्ञात व्यक्‍तीचा शोध लागू शकतो.