Wed, Jul 17, 2019 16:19होमपेज › Konkan › अन् हॉटेलच्या खिडकीतून प्रवेशले ‘सांबर

अन् हॉटेलच्या खिडकीतून प्रवेशले ‘सांबर

Published On: Dec 19 2017 2:00AM | Last Updated: Dec 18 2017 10:17PM

बुकमार्क करा

आंबोली ः वार्ताहर

आंबोली -बाजारवाडी येथे सोमवारी सकाळी भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून जीव वाचविण्यासाठी पळणारे एक  सांबर थेट आंबोलीतील एका हॉटेलच्या खिडकीची काच तोडून थेट हॉटेलात घुसले या प्रयत्नात ते सांबर किरकोळ जखमी झाले.    गेल्या काही महिन्यांपासून आंबोली परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. या कुत्र्यांचे टोळके थेट लगतच्या जंगालात जात वन्यप्राण्याचीं पाठलाग करते. बर्‍याच वेळा या कुत्र्यांपासून जीव वाचविण्यासाठी पळणारे प्राणी थेट लोकवस्तीत किंवा भरबाजारपेठेत येतात. गेल्या काही महिन्यांपासून 6 ते 7 सांबर या कुत्र्यांपासून वाचण्यासाठी वस्तीत आली आहेत.

सोमवारी सकाळी या भटक्या कुत्र्यांची टोळी जंगलात शिकारीसाठी फिरत असताना त्यांनी सांबर ाच्या पिल्लाचा पाठलाग सुरू केला. जिवाच्या आकांताने पळणारे हे सांबर बाजारवाडी मुख्य रस्त्यावर आले.  यावेळी जीव वाचविण्यासाठी या सांबराने तेथीलच एका हॉटेलच्या खिडकीवर उडी मारली. यामुळे खिडकीच्या स्लायडींगची काच तुटून सांबर थेटे आतील टेबल- खूर्चीवर आदळले. या अनपेक्षित प्रकाराने हॉटेलमधील कर्मचारी व ग्राहकही चक्रावून गेले. मात्र, परिस्थिती लक्षात येताच हॉटेलमधील कामगारांनी त्या सांबराच्या पिल्लाला पकडून ठेवले. यानंतर कामगारांनी वनविभागाच्या कर्मचार्‍यांना माहिती दिल्यावर वनकर्मचार्‍यांनी दाखल होत सांबराच्या पिल्लाला ताब्यात घेतले. सांबरावर प्रथमोपचार करुन  त्याला जंगलात सोडण्यात  आले.