Fri, Mar 22, 2019 05:47
    ब्रेकिंग    होमपेज › Konkan › आंबोली घाट बनला मृत्यूचा सापळा!

आंबोली घाट बनला मृत्यूचा सापळा!

Published On: Aug 19 2018 1:32AM | Last Updated: Aug 18 2018 8:45PMसावंतवाडी : प्रतिनिधी

कर्नाटक कोल्हापूर आंतरराज्य मार्ग जोडणारा आंबोली घाट मृत्यूचा सापळा बनत चालला असून घाटरस्त्याचे कठडे कोसळून होणार्‍या  या अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकडे माजी आमदार शिवराम दळवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले आहे.

पोलादपूर घाटात बस कोसळून झालेल्या भीषण अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये. आंबोली घाटात गेल्या दोन वर्षांत झालेेले वाहन अपघात पाहता आंबोली घाटातील  कठडे आणि रिप्लेक्टरची उणीव तातडीने पूर्ण करण्याची गरज माजी आ.दळवी यांनी व्यक्‍त केली आहे.आपण याबाबत सावंतवाडी बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांना लेखी पत्र दिले   असून आंबोली घाटातील संरक्षक कठडे आणि रिप्लेक्टर बसवावा.घाटरस्ता सुरक्षेबरोबर घाटात व धबधब्याच्या ठिकाणी कोसळणार्‍या  दरडीची दखल घेऊन दरड कोसळण्याच्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.